नवीन वर्षाची सुरुवात।

7 जानेवारीच्या क्रीडामहोत्सवाची प्रतीक्षा अखेर 7 जानेवारीची धुक्याने लपेटलेली पहाट उजाडली। एक उनाड दिवस रात्रभर तशी कमिटी मेम्बर्स ना झोप नव्हतीच। आदल्या दिवशी रात्री पर्यंत त्यांची तयारी चालू होती। आज सकाळी 7 च्या आधीच सगळे नटराज च्या मैदानावर हजर। घरातील कार्यात कशी गडबड होते ?? अनामिक ताण असतो ना अगदी तसेच सर्वाना वाटत होते। हो। सगळेच " नारायण " झाले होते। सगळी व्यवस्था नीट आहे ना ?? सामान आलेय ना ?? खरं तर कामाची विभागणी केल्यामुळे प्रत्येकाने आपली ड्युटी चोख बजावली होती। 7 वाजता बॅडमिंटन सुरू झाले। मस्त थंडी होती। स्पोर्टस डे ची वातावरण निर्मिती झाली होती। एवढ्या थंडीत कुणी वेळेवर येईल याची खात्री नव्हती। पण काय आश्चर्य?? 8 वाजता अगदी ज्येष्ठ नागरिक ही उपस्थित होते। शॉ ल जर्किन्स। सगळे स्पोर्टस च्या मूड मध्ये। परशुरामाच्या मूर्तीची पूजा करून दीप प्रज्वलन झाले। सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तीला हा मान देऊन त्यांच्या सोबत आपले उत्साही कार्यकर्ते होते। गरम गरम बटाटेवडे आणि उपमा। त्यावर चहा। ग्राउंड वर मस्त आस्वाद घेतला। त्यावर sunbath.

एकीकडे कॅरम। बुद्धिबळ। रिकामे नव्हते हं कुणी। उन्हात अंताक्षरी चालली होती। झाडाखाली चिंटू पिंटू drawing काढत होते। नंतर त्यांचे विविध खेळ झाले। अगदी 4 वर्षा पासून 80 + पर्यंत सर्वांनी भाग घेतला क्रिकेट। मस्त माहोल होता। कोण म्हणतं जनरेशन गॅप??? आम्हाला आज नाही दिसली कुठे। बहुतेक उत्साहाला घाबरून दडून बसली कुठेतरी। शाळेतील ट्रिप जायचो ना अगदी तसेच वाटत होते। निवांत डोक्यात कुठलेच विचार नाहीत। आणि हो। आज कामवाल्या बाईला सुट्टी दिली असली तरी कुणीही तिच्या बद्दल चर्चा करताना आढळले नाही ही केवढी मोठी गोष्ट आहे। क्रिकेट मध्येही सर्व चिरतरुण सभासदांनी भाग घेतला महिला सुद्धा। विविध स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या। 1 वाजता दमलेले खेळाडू भोजनावर ताव मारत होते। अप्रतिम मेनू। नंतर प्रश्न मंजुषा डोक्यालाही थोडे खाद्य हवे ना ??? संगीत खुर्ची। लहान मुलांनी आणि चिरतरुण सर्वांनी त्यात भाग घेतला। शिट्टी च्या मधुर आवाजावर पळत होते बिचारे।

नंतर बक्षीस समारंभ। चहा। येई पर्यंत सर्वाना प्रश्न पडला होता की वेळ कसा जाईल दुपारचे 4 कधी वाजले कळलेच नाही। कुणाचाही पाय निघत नव्हता। सर्वांनी इतके सहकार्य दिले। निघताना एकच प्रश्न पडला की आता असा कार्यक्रम परत कधी ?? घरी आल्यावर दिवसभराची नशा उतरलीच नाही अजून। असा हा उनाड दिवस मावळला।